शिवाजी औरंगजेब भेट
सदस्यत्व :
  कूटशब्द :
  
कूटशब्द विसरलात ? इथे क्लिक करा
नवीन सदस्य ? इथे नोदणी करा
संपत्र :
विषय :
पत्राचा मसुदा
ठरविल्याप्रमाणे औरंगजेबच्या पन्नासाव्या वाढदिवसापुर्वी एक दिवस आधीच शिवाजी आग्र्याबाहेर पोहोचला होता. मुघल पद्धतीप्रमाणे प्रतिष्ठित पाहुण्याची शहराबाहेर भेट घेऊन, त्याला मानाची वस्त्रे व इतर मुल्यवान भेटी देऊन अगत्यपूर्वक स्वागत केले जात असे. शिवाजीने ह्या शिरस्त्याप्रमाणे त्याचे स्वागत होईल अशी अपेक्षा धरली असेल तर ती अवाजवी नव्हती.

पण मुलुकचंद सराईमधे असे काही झाले नाही. शिवाजीच्या अपेक्षाभंगांची ही सुरुवात होती. रामसिंहला कल्पनाच नव्हती की शिवाजी आग्र्याच्या इतक्या जवळ येऊन पोहोचला आहे. ते कळल्यावर त्याने गिरधारीलाल मुनशीला शिवाजीचे स्वागत करायला पाठवले. भव्य स्वागताचे जयसिंहने दाखवलेले स्वप्न क्षणात धुळीला मिळाले.

तरी शिवाजीने काही दाखवले नाही व तो मुलुकचंद सराईमधे राहिला. दुसऱ्या दिवशी औरंगजेबने रामसिंह व मुखलीसखानला शिवाजीला दरबारात घेऊन येण्यासाठी पाठवले. हे दोघेही प्रत्येकी अडीच हजार व दीड हजार मनसब असलेले खालच्या वर्गाचे सरदार होते. त्याच दिवशी रामसिंहकडे राजवाड्याच्या सुरक्षेचीही जबाबदारी होती. त्यामुळे त्याला शिवाजीला भेटायला लवकर निघता आले नाही.

रामसिंहवर मुद्दामून हा अतिरीक्त भार दिला होता की नाही ते माहित नाही. पण त्यामुळे शिवाजीच्या भेटीला उशीर झाला हे निश्चित. सकाळी दहाला दरबार भरणार होता. रामसिंहने पुन्हा एकदा गिरधारीलालला शिवाजीला शहरात आणण्यासाठी पाठवले. अपेक्षाभंग सहन करत शिवाजी गिरधारीलाल बरोबर शहरात आला.

राजवाड्यातील जबाबदारी पार पाडून रामसिंह व मुखलीसखान शिवाजीला भेटायला निघाले. त्यांनी फिरोजा बागेकडून असलेली वाट घेतली पण गिरधारीलालने शिवाजीला दाहरआरा बागेकडून शहरात आणले. हा घोटाळा लक्षात आल्यावर रामसिंहने गिरधारीलालला नूरजहां बागेपशी थांबण्यासाठी संदेश पाठवला.

शेवटी दोघांची भेट झाल्यावर रामसिंहने घोड्यावरूनच शिवाजीला आलिंगन दिले व मुखलीसखानचीही ओळख करुन दिली. तिथून ते शिवाजीच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेले. रामसिंहने त्याच्या राहत्या घराशेजारी शिवाजीसाठी तंबू ठोकले होते. शिवाजीसाठी हा आणखी एक अपेक्षाभंग होता. तोवर तिकडे दरबार भरला होता त्यामुळे ते लगबगीने दरबाराकडे निघाले.

तिथे गेल्यावर कळाले की दीवान-ए-आम मधील दरबार संपला होता. औरंगजेबची तुला व इतर समारंभही झाले होते व तो दीवान-ए-खास मधे गेला होता. ह्या दरबारात काही खास मंडळीच बोलावली जायची. औरंगजेबला शिवाजीच्या आगमनाची वार्ता सांगितली गेली तोवर दरबाराचे काम सुरु झाले होते.

शिवाजी व संभाजीला सिंहासनाकडे नेण्यात आले. त्यांनी एक हजार मोहरा, दोन हजार रुपये नजराणा व पाच हजार रुपये निस्सार अशी बादशाहला भेट देऊ केली. औरंगजेबकडून एकही शब्द आला नाही. भेटवस्तू दिल्यावर शिवाजी, संभाजीला दरबारातल्या शेवटच्या रांगेत नेऊन उभे करण्यात आले. शिवाजीची कोणतीही दखल न घेता दरबाराचे काम पुन्हा सुरु झाले.

हे सगळे शिवाजीला अगदीच अनपेक्षित होते व जयसिंहने केलेल्या वर्णनाविपरीत होते. शिवाजीला निश्चितच राग अनावर झाला असणार. त्याने रामसिंहकडे बघत त्याला खडसावून विचारले 'रामसिंह, माझ्या पुढे हा कोण उभा आहे ?'. ह्या कणखर आवाजाने दरबार स्तंभित झाला कारण तिथे बादशाहच्या आज्ञेविना तोंडातून ब्र काढण्याचीही कोणाची छाती नव्हती.

रामसिंह गडबडला व शिवाजीला शांत करत त्याने सांगितले की त्याच्या पुढे उभे असलेले सरदार जसवंतसिंह आहेत. ते ऐकुन शिवाजी आणखीनच चिडला कारण त्याच्या लोकांनी जसवंतसिंहाला अनेक वेळा झोडपून काढला होता. त्याला जसवंतसिंहामागे उभे करण्यात आल्याने त्याचा हेतुपुरस्सर अपमान केला आहे हे त्याने ओळखले. 'माझ्या माणसांनी युद्धात ह्याची पाठ अनेक वेळा पाहिली आहे. असे असताना ह्याला माझ्या पुढे उभे केले आहे. ह्याचा काय अर्थ होतो ?' शिवाजी पुन्हा कडाडला.

रामसिंह शिवाजीला शांत करायचा प्रयत्न करत होता पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. 'हे काय चालले आहे ? माझा मुलाकडे पंच हजारी मनसब आहे, माझ्या हाताखालच्या नेताजीकडेही पंच हजारी मनसब आहे. इतके सगळे मिळवून मी ह्यासाठी इथे आलो आहे काय ?'. हा सगळा गोंधळ ऐकून औरंगजेबने रामसिंहला विचारले की शिवाजीला काय त्रास आहे. हे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे होते.

तोवर दरबारातील मान्यवरांना मानाची वस्त्रे दिली जात होती. शिवाजी पुन्हा रामसिंहावर गरजला, 'तू पाहिले आहेस, तुझ्या वडिलांनी पाहिले आहे व तुमच्या बादशाहनेही पाहिले आहे की मी कुठल्या क्षमतेचा माणूस आहे. तरी तुम्ही मला इतका खालच्या पातळीवर उभे केलेत ? मला उभे राहायला सांगितले हेच मुळात अयोग्य आहे. आणि जर करायचे होतेच तर माझ्या क्षमतेची जाण ठेवून करायला पाहिजे होते. मी तुमची मनसब धुडकावून लावतो'. असे बोलून बादशाहला पाठ दाखवून तो सरळ चालू लागला.

रामसिंहने त्याला थांबविण्यासाठी त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला पण शिवाजीने तो झटकला व मागच्या बाजूस एका कोपऱ्यात जाऊन बसला. रामसिंह अजूनही त्याला समजावत होता पण शिवाजी काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. 'माझ्या मृत्यूचा दिवस आला आहे. माझा शिरच्छेद करा किंवा मी स्वतःला मारुन टाकीन पण मी पुन्हा बादशाहला भेटायला जाणार नाही.' रामसिंह लगबगीने बादशाहकडे गेला व त्याला झाली परिस्थिती सांगितली.

औरंगजेबने मुल्ताफखान, अखिलखान व मुख्लीसखानला शिवाजीला खिलत पेश करून त्याला दरबारात आणायला सांगितले. रामसिंहबरोबर हे तिघे शिवाजीकडे आले पण शिवाजी काही केल्या ऐकेना. 'मी ही खिलत घेणार नाही. बादशाहने जाणूनबुजून माझा अपमान केला आहे. मी त्याची मनसब धुडकावून लावतो. त्याने मला मारुन टाकावे वा बंदी करावे पण मी कधीही त्याची चाकरी करणार नाही' असे शिवाजीने खडसावून सांगितले.

बादशादला हा निरोप सांगण्यात आला. त्यावर त्याने रामसिंहला बोलावून शिवाजीला त्याच्या घरी नेण्यास सांगितले. रामसिंहने शिवाजी व संभाजीला त्यांच्या राहायच्या ठिकाणी नेले. त्याकाळच्या दोन भव्य व्यक्तिमत्वांमधली, दोन धृवांमधली, अनेकदा ज्यांचा उल्लेख शुभ व अशुभ असा केला जातो, भेट ही अशी झाली.
घटनांची सूची
सन १५९९
शाहजीचा जन्म
सन १६०५
बादशाह अकबरचा मृत्यू
सन १६११
मालोजी भोसलेचा मृत्यू
सन १६१२
शहाजी-जिजाबाई विवाह
सन १६१६
दख्खनवर मुघली आक्रमणे
सन १६२३
विठोजी भोसलेचा मृत्यू
सन १६२४
भातवडीचे युद्ध
शहाजी आदिलशाहीस मिळतो
जाधव-भोसले कलह
जिजाबाई पोटी संभाजी जन्मला
सन १६२६
मलिक अंबरचा मृत्यू
जहांगीरचा मृत्यू
सन १६२७
इब्राहिम आदिलशाहचा मृत्यू
सन १६२८
शहाजी निजामशाहीत परततो
सन १६२९
लखुजी जाधव मारला जातो
शाहजहान ब-हाणपूरला पोहोचतो
सन १६३०
पुण्यावर आदिलशाही आक्रमण
१६३० चा भयंकर दुष्काळ
शिवनेरीवर शिवाजी जन्मला
शहाजी मुघलांना मिळतो
सन १६३१
मुमताझ बेगमचा बु-हाणपूरला मृत्यू
सन १६३२
शहाजीचे बंड
शाहजहान बु-हाणपुरहून परततो
परिंडा आदिलशाहीकडे जातो
सन १६३३
शहाजी निजामशाही चालवतो
शहाजी दौलताबाद लुटतो
निजामशाह कैदेत
सन १६३४
महाबतखानचा परिंड्याला मृत्यू
दौलताबादचा पडाव
सन १६३५
आदिलशाहीत बेबनाव
शाहजहानची दुसरी दख्खन मोहिम
सन १६३६
जिजाबाई व शिवाजी पुण्यात येतात
पुण्याची स्थिती सुधारते
शहाजी माहुलीस पराभूत
शहाजी कर्नाटकास जातो
सन १६४०
शिवाजी-सईबाई विवाह
सन १६४१
शिवाजी बंगळूरहून परततो
सन १६४२
शिवा जंगमची रायरेश्वरला नेमणुक
सन १६४५
शिवाजी तोरणा व राजगड जिंकतो
सन १६४६
मोरेश्वर गोसाव्याला भूमीदान
शहाजी व आदिलशाहीतमधे तडे
शिवाजीची मुद्रा
दादोजी कोंडदेवचा मृत्यू
कोंढाणा परत घेतला
बाबाजी पाटीलला शिक्षा
सन १६४७
कसबा गणपती देऊळात विनायकभटाची नेमणूक
सन १६४८
शहाजीला अटक
कावजी शिववळ परत घेतो
फतेहखानची मोहिम
मुस्तफाखानचा मृत्यू
सन १६४९
जावळीत शिवाजीची मध्यस्थी
अफझलखानची जावळी मोहिम
कान्होजी जेधे शिवाजीच्या मदतीस येतात
शहाजीची सुटका
सन १६५०
महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार
सन १६५३
गोपाळभट श्रीधरभटाची महाबळेश्वर देवळात नेमणूक
सन १६५४
शिवाजी पुरंदर ताब्यात घेतो
शिवाजीचे नीळकंठरावांना पत्र
सन १६५५
कनकगिरीला संभाजीचा मृत्यू
सन १६५६
शिवाजी सुपे घेतो
शिवाजी-मुघल पत्रव्यवहार
जावळी मोहिमेचे महत्व
शिवाजी जावळी जिंकतो
जावळी मोहिमेचा आढावा
जावळी प्रास्ताविक
जावळीवर आक्रमण
शिवाजीचा मसुरवर हल्ला
मुहम्मद आदिलशाहचा मृत्यू
सन १६५७
शिवाजीची उत्तर कोकण मोहीम
शिवाजी दंडा-राजापुरी जिंकतो
शिवाजी कोंढाणा जिंकतो
१६५७-५८ च्या मोहिमेत इतर किल्ले घेतले
मराठा नोदलाची सुरूवात
शिवाजीच्या १६५७-५८ च्या मोहीमेचा आढावा
शिवाजी भवानी तलवार विकत घेतो
शिवाजीची आदिलशाहीवर मोहीम
आदिलशाहीत अंतर्गत फूट
औरंगझेबचा बीदरवर हल्ला
शिवाजी जुन्नर लुटतो
शिवाजी अहमदनगर लुटतो
जुन्नर व नगर हल्ल्याचे समिक्षण
सईबाई पोटी संभाजी जन्मला
पुरंदरवर नेताजी पालकरची नेमणूक
सन १६५८
शिवाजीचा माहुलीवर हल्ला
चाफळच्या मंदिराला वार्षिक सन
औरंगजेबचे शिवाजीला पत्र
शिवाजीचे बाजीप्रभूला पत्र
शहाजी शिवाजीच्या कारवायांवर हात झटकतो
औरंगजेब सिहानावर बसतो
सन १६५९
अफझलखान शिवाजीला मारण्याचा विडा उचलतो
मोहिमेतल्या सुरूवातीच्या चाली
अफझलखानच्या मोहिमेचे पूर्वसूत्र
अफझलखान वाईत पोहोचतो
अफझलखान व शिवाजीचा पत्रव्यवहार
अफझलखान भेटीची तयारी
अफझलखान जावळीस पोहोचतो
अफझलखानची मोहिम
अफझलखानच्या मोहिमेचे सार
आदिलशाही फौजा पन्हाळगडाजवळ पराभूत
शिवाजी अफझलखान भेट
अफझलखानच्या वधानंतरचे युद्ध
अफझलवधानंतर शिवाजीची वेगवान चाल
अफझलवधानंतर शिवाजीची चढाई
सुपे, शिरवळ व सासवड परत शिवाजीकडे
अफझलवधानंतरच्या शिवाजीच्या मोहिमेचा आढावा
नेताजीच्या वादळी हलचाली
दौलोजीची कोकणावर चाल
सन १६६०
शाहिस्तेखानच्या छावणीवर छापे
शाहिस्तेखानची मोहिम
शाहिस्तेखान औरंगाबाद सोडतो
सिद्दी विजापूरहून कूच करतो
सिद्दी जोहरची मोहिम
पन्हाळगडास वेढा पडतो
नेताजी आदिलशाही भागात हल्ले करतो
शिवाजी मिरजेहून पन्हाळगडावर येतो
शाहिस्तेखान पुण्यात छावणी टाकतो
मराठे वासोटा जिंकतात
चाकणचे युद्ध
चाकणला शाहिस्तेखानचा वेढा
नेताजीचे सिद्दीच्या पहा-यांवर हल्ले
शिवाजी पन्हाळगडवरून निसटतो
पन्हाळगडावरून विशाळगडाकडे
शिवाजी विशाळगडावर पोहोचतो
घोडखिंडीचे युद्ध
सिद्दीच्या मोहिमेचे विश्लेषण
बांदल देशमुखांचा सन्मान
खंडोजी खोपडेला धडा शिकवला
कान्होजी जेधेचा मृत्यू
सिद्दी जोहरचा मृत्यू
सन १६६१
कारतलबखान कोकणाकडे कूच करतो
शिवाजी दाभोळ जिंकतो
शिवाजी चिपळून जिंकतो
शिवाजीची कोकण मोहिम
कारतलबखानची शरणागती
शहाजी तेंगणापट्टण जिंकतो
शिवाजी संगमेश्वर जिंकतो
सूर्यराव तानाजीवर चालून जातो
सूर्यराव सुर्वे शिवाजीला मिळतो
देवरूखच्या राममंदिराची पुनर्स्थापना
शिवाजीने राजापूर जिंकले
शिवाजी पाली जिंकतो
शिवाजी शृंगारपूर जिंकतो
शिवाजी राजगडावर परततो
शहाजी पोर्टोनोव्हा जिंकतो
प्रतापगडावर तुळजा भवानीचे मंदिर बांधले
इंग्रजांचा शिवाजीशी पत्रव्यवहार
शिवाजीच्या मंत्रीमंडळात फेरफार
शिवाजीची मुलगी सकवारबाईचा जन्म
देहरीगडास कावजी कडून बुलाखी पराभूत
नेताजीचे सुपे ते परिंडा भागात छापे
सन १६६२
शिवाजीच्या मंत्रीमंडळात फेरफार
शिवाजी नामदारखानाचा पराभव करतो
नेताजी सर्फराजखानासमोर माघार घेतो
बडीबेगम मक्क्याहुन परतते
शिवाजीचे सर्जेराव जेधेला पत्र
सन १६६३
जेरबंद केलेल्या इंग्रजांची मुक्तता
लाल महालावरील हल्ल्याची पूर्वतयारी
स्वराज्यात मुघलांचे अत्याचार
शिवाजीची लाल महालावर झडप
लाल महालावरील हल्ल्याचे विश्लेषण
शिवाजीची लाल महालावर झडप
शाहिस्तेखानचे पुण्याहून पलायन
पोर्तुगीजांकडून शिवाजीस पत्र
जसवंतसिंह कोढाण्याचा नाद सोडतो
शिवाजी सुरतेकडे कूच करतो
सुरतेच्या छाप्याची तयारी
छाप्यासाठी सुरतेची निवड
सन १६६४
शिवाजीचा सुरतेवर पहिला छापा
शिवाजीचे मुघल अधिका-यांना पत्र
सुरतेची लूट
शिवाजी सुरतेहून परततो
शहाजीचा होदेगिरीस मृत्यू
सिद्दी अझिजखानचा मृत्यू
खवासखान कुडाळास पोहोचतो
खवासखानची शिवाजी विरूद्ध नेमणुक
खवासखानची शिवाजी विरुद्ध मोहिम
शिवाजीचा कुडाळवर हल्ला
शिवाजीचा मुधोळवर हल्ला
मिर्झाराजांची मोहिम
मिर्झाराजांची शिवाजी विरुद्ध नियुक्ती
सावंतवाडीच्या सावंताशी तह
शिवाजी फोंडा जिंकतो
सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरू
हुबळी, वेंगुर्ले लुटले
सन १६६५
जिजाबाईची तुळा
सोनोपंत डबीरचा मृत्यू
शिवाजीची बसनूर स्वारी
शिवाजीची कारवार वर स्वारी
जयसिंगचा डाव
दिलेरखान पुरंदरास पोहोचतो
शिवाजीचे जयसिंगास पत्र
दाऊदखान गावे बेचिराख करतो
मुरारबाजीचा पराक्रम
दिलेरखानला वज्रगड मिळतो
पुरंदरवर रसद पोहोचते
पुरंदरला दिलेरखानाचा पराभव
कोंढाण्यावर हल्ला
रघुनाथपंत जयसिंग यांची भेट
मुघलांशी तहाचे समीक्षण
शिवाजीची मनुची बरोबर चर्चा
दिलेरखानचा शेवटचा प्रयत्न
शिवाजी जयसिंग भेट
शिवाजी-जयसिंग यांच्यात करार
शिवाजी दिलेरखान भेट
कोंढाण्याचे हस्तांतरण
औरंगझेबास जयसिंगचे पत्र मिळते
जयसिंग कोंढाण्यास जातात
औरंगजेबचा तहाला होकार
आदिलशाहीवर दुहेरी आक्रमण
सन १६६६
जयसिंह शिवाजी-औरंगजेब भेटीचा आग्रह धरतो
आदिलशाहीवरील हल्ल्यानंतर मुघलांची पिछेहाट
पन्हाळ्यावर शिवाजाचा पराभव
आग्य्राला शाहजहानचा मृत्यू
शिवाजीचा आग्रा प्रवास
शिवाजीचे आग्र्याकडे कूच
नेताजी मुघलांना मिळतो
आग्र्याला औरंगजेबचा राज्यारोहण समारंभ
काबूलचे षडयंत्र
शिवाजीवर नजरकैद
शिवाजी विरुद्ध षडयंत्र
शिवाजी औरंगजेब भेट
शिवाजी - औरंगजेब पत्रे
शिवाजीचे पथक माघारी जाते
आग्रा ते राजगड
आग्र्याला शिवसुटकेचा धक्का
आग्र्याहून सुटका
नेताजी मुघल कैदेत
संभाजी मथुरेहून परततो
सन १६६७
शिवाजी शेतजमीनीचा सारा ठरवितो
शिवाजीचा मुघलांशी पुन्हा तह
रांगण्याचा लढा
मिर्झाराजे जयसिंहचा मृत्यू
संभाजी औरंगाबादेस पोहोचतो
सन १६६८
बारदेशवर स्वारी
शिवाजीला 'राजा' पदवी बहाल
शिवाजीचा गोव्यावर निष्फळ प्रयत्न
सप्तकोटेश्वरचा जीर्णोद्धार
सन १६६९
औरंगजैब मंदिरे उध्वस्त करतो
जंजी-यावर हल्ला
निराजी व प्रतापराव औरंगाबादवरून निसटतात
सन १६७०
औसावर मराठ्यांची धाड
शिवाजी - मुघल तह मोडतो
सिंहगडावर आक्रमण
राजगडावर राजारामाचा जन्म
कल्याण भिवंडीवर स्वारी
जुन्नर व नगरवर आक्रमण
पुरंदर पुन्हा स्वराज्यात
माहुली घेण्यात अपयश
दिलेरखान व मुअज्जम मधे फूट
माहुलीवर दुसरे आक्रमण
कर्नाळा व रोहिडा मराठ्यांकडे
सुरतेवर दुसरा छापा
दिंडोरीचे युद्ध
कारंजे लुटले
सन १६७१
मुघल बागलाणातले गड घेतात
छत्रसाल बुंदेला शिवाजीला भेटतो
दंडा राजापुरीवर सिद्दीचा छापा
सन १६७२
दिलेरखानचा पुण्यावर हल्ला
कण्हेरगडाचे युद्ध
साल्हेरच्या पराभवाने औरंगजैबला धक्का
साल्हेरचे युद्ध
मोरोपंतांचा सर्वत्र विजयी संचार
रामदास स्वामींचे शिवाजीला पत्र
अब्दुल्ला कुतुबशाहचा मृत्यू
शिवाजी - रामदास स्वामी भेट
अली आदिलशाहचा मृत्यू
सन १६७३
कोंडाजी पन्हाळगड घेतो
उमराणीस बहलोलखानाचा पराभव
शिवाजीची कारवारवर स्वारी
गागाभट रायगडास पोहोचतात
सन १६७४
प्रतापराव बहलोलखानावर चालून जातो
आनंदराव बहलोलखानावर चालून जातो
काशीबाईचा मृत्यू
राज्याभिषेकाची तयारी
शिवाजी चिपळुणला पाहाणी करतो
केंजळगड स्वराज्यात येतो
शिवराज्याभिषेकाचा व्यय
शिवाजीचा राज्याभिषेक
शिवराज्याभिषेक
इंग्रज वकील शिवाजीस भेटतो
शिवराज्याभिषेकाचे शक
इंग्रजांबरोबर करार
जिजाबाईचा मृत्यू
शिवाजी बहादुरखानला फसवतो
शिवाजीची ब्रिटिशांना चपराक
फोंड्यावर अयशस्वी चढाई
शिवाजीचा तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक
सुरतेवर तिसरी धाड विफल
शिवाजी खानदेश लुटतो
सन १६७५
शिवाजीची जिवाजीपंतांना चपराक
बहादुरखानला पुन्हा मराठी इंगा
शिवाजी फोंड्यावर चालून जातो
शिवाजी कारवारवर जिंकतो
ऑस्टिनची शिवाजीबरोबर भेट
जंजी-यावर आणखी एक प्रयत्न
शिवाजीची प्रकृती बिघडते
सन १६७६
बिजापुरात अंतरगत कलह
शिवाजीचा अथणीवर छापा
व्यंकोजी थंजावूर जिंकतो
नेताजी रायगडास परततो
रामदास सज्जनगडावर येतात
मोरोपंतांचा जंजी-याचा डाव फसतो
शिवाजीचे दक्षिणेस कूच
शिवाजीचा दक्षिणदिग्विजय
संभाजी शृंगारपुरास जातो
सन १६७७
हंबिरराव पठाणांचा पराभव करतो
शिवाजी भागानगरास पोहोचतो
कुतुबशाहबरोबर तह
शिवाजी भागानगरहून कूच करतो
त्र्यंबक सोनदेवचा मृत्यू
नळदुर्ग व गुलबर्गा मुघलांकडे
जिंजी व वेल्लोर
शिवाजी व्यंकोजी भेट
शिवाजी दक्षिणेतून परततो
वलंदेज वकील शिवाजीची भेट घेतात
व्यंकोजीचा पराभव
बहलोलखानचा मृत्यू
सन १६७८
मराठे वेल्लोर जिंकतात
संभाजी मुघलांना मिळतो
दत्ताजीपंतांचा मृत्यू
सन १६७९
कोप्पळ मराठ्यांकडे
औरंगजेब जझिया कर लावतो
मुघल भुपाळगड जिंकतात
जोधपूर मधील मंदिरे पाडली
खांदेरीचे नाविक युद्ध
खांदेरीवर सुरवातीचे दावे
खांदेरीवर दुसरा प्रहार
विजापुरास दिलेरखानाचा पराभव
सिद्दी खांदेरीस पोहोचतो
संभाजी मुघलांकडून स्वराज्यात येतो
सिद्दी उन्देरीवर उतरतो
सन १६८०
इंग्रज खांदेरी सोडतात
रायगडावर राजारामाचे लग्न
शिवाजीचा मृत्यू